Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Events 
    करिअर कट्टा - उद्योजक आपल्या भेटीला
    ( Keshayurved Hair & Skin care Pvt.Ltd. )

    About Event:  

    महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर कट्टा"(IAS आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला) हे दोन उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

    यामध्ये आज #केशायुर्वेद या जगभरात 108 शाखा असलेल्या भारतातील पहिल्या आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब व रिसर्च सेंटर चे जनक , संस्थापक डॉ हरिश पाटणकर यांची मुलाखत सायंकाळी 7 ते 8 वाजता घेतली जाईल. नवतरुण, बारावी नंतर काय? BAMS नंतर काय ? बाहेरील देशात आयुर्वेदाच्या संधी या व अश्या अनेक विषयांवर यशस्वी उद्योजक कसे व्हावे या संदर्भात डॉ हरिश पाटणकर मार्गदर्शन करतील.  हे व्याख्यान ऑनलाइन स्वरूपात असेल, सोबत शेवटी झूम लिंक व पासवर्ड दिला आहे. आवर्जून पहा व नवं तरुणांना, उद्योजकांना ही सांगा. 

    उपक्रमाबद्दल थोडंस- 

    १) IAS आपल्या भेटीला 
    महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे, दिल्ली याठिकाणी वेगवेगळ्या सुविधा व मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून युवक शहरी भागामध्ये येतो. तो थांबवणे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी करावा लागणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावा,  यासाठी IAS आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत दिल्ली, मुंबई अथवा संपूर्ण भारतामध्ये कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दररोज एक याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वेगवेगळे अनुभव लोकांना प्रेरणा व प्रोत्साहन तर देतीलच पण त्याचबरोबर युवकांचा प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये देखील मदत होईल.

    २) उद्योजक आपल्या भेटीला 
    महाविद्यालयीन युवक ज्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांचे उद्योजकीय कौशल्य वाढीस लागण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या दृष्टिकोनातून “उद्योजक आपल्या भेटीला” हा उपक्रम राज्यभरामध्ये राबविण्यात येणार आहे.महाविद्यालयांमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या ‘उद्योजक विकास विभाग’ त्याच्याशी संलग्न करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उद्योजकीय कौशल्य विकास उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या बँकांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, वेगवेगळे तज्ञ या अंतर्गत मार्गदर्शन करतील.

    Topic: करिअर कट्टा - उद्योजक आपल्या भेटीला
                                                                                                                                                                                                                                          Time: Oct 2021 07:00 PM India
            
    Join Zoom Meeting
    https://zoom.us/j/99787042791?pwd=RnFHWFVHQ3M0OVhBUVhSakQyNFBsQT09

    Meeting ID: 997 8704 2791
    Passcode: 633125


    Date and Time:  
    20 Oct 2021-20 Oct 2021 ,
    06:00 pm-08:00 pm


    Contact Details: