काही दिवसांपूर्वी एक रुग्णा चिकित्सलयात आली होती.
आदरणीय वैद्य वैभव मेहता सरांनी खास तिला केशायुर्वेद मध्ये हेअर टेस्टिंग करून या असा सल्ला दिला होता. त्याची गम्मत अशी झाली की ती रुग्णा सतत सांगत होती की माझ्या डोक्यात फार खाज सुटते आणि मला सतत आत काहीतरी चावतय असे वाटतंय. पण मी आजपर्यंत ज्या ज्या ऑलोपॅथिक डॉक्टरांना दाखवले त्यांनी सर्वांनी हे काही नाही, हे तुमचे भास आहेत असेच सांगितलं. काही नि तर चक्क त्यांना सायकॉलॉजिस्ट कडे पाठवलं. त्यांनी पण हे सगळं मानसिक आहे असा शेरा मारून तशीच औषधें ही दिली व निदान पण सायको डर्मा टायटीस असेच केले. घरी पण त्यांच्या या सततच्या तक्रारीने कुटुंब कंटाळले होते, आता तर त्यांना सगळेच जण वेडात काढत होते.
ही सायकोच आहे असा जणू समजच करून घेतलेला.
मात्र रुग्ण तिच्या लक्षणांवर ठाम होती.
आणि सरांनी पण तिला तापसल्याने त्यांना ही लक्षणे कृमीजन्य व खरी वाटत होती. म्हणून अजून निदानाचे कन्फेर्मेशन करायला रुग्णानेच असे एखादे हेअर टेस्टिंग रिपोर्ट्स देणारे लॅब आहे का विचारल्यावर लगेच केशायुर्वेद लॅब ला पेशंट ला टेस्टिंग साठी पाठवले व रिपोर्ट्स घेऊन या म्हणाले.
जेंव्हा या पेशंट चे रिपोर्ट्स आले तेंव्हा आम्हीच सगळे थक्क झालो.
खरच तिच्या डोक्यात असंख्य बारिक बारीक कृमी अर्थात उवा , लिका होत्या की ज्या तिला सतत चावायाच्या.
आजकाल त्याही बारीक झाल्याने उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत.
पण रिपोर्ट्स पाहिल्यावर रुग्ण मात्र कमालीची आनंदी झाली.
सरांनी तिला विचारलं की तुम्ही उलट खुष का झालात कळले नाही.
तर त्या म्हणाल्या की तुम्हाला नाही कळायचं सर , तुमचे फार उपकार झालेत आज माझ्यावर, तुम्ही आज सिद्ध केलत की मी वेडी नाहीये. माझं खरंच डोकं खाजतंय हो.
मला माहित आहे की आता तर निदान झाल्याने तुम्ही मला बरे कारालच. पण तुम्ही मला मी वेडी नाहीये हे सिद्ध करून रिपोर्ट्स वर दाखवलय याचा आनंद माझा गगनात मावत नाहीये.
मला कळतच नव्हते की मी माझ्या कुटुंबाला कसं समजून सांगू? मला वेडात काढलं होतं हो सर सगळ्यांनी.
थ्यांकू व्हेरी मच.
मेहता सरांनी लगेच मला हा किस्सा फोन करून सांगितला.
नंतर गुरुकुल ला आल्यावर पण व्याख्यानात सांगितला.
खरंतर आभार आदरणीय मेहता सरांचे मानायला हवेत.
कारण त्यांच्यामुळे आज अश्या कित्त्येक रुग्णांचे निदान होत आहे.
आम्ही तर काम करतच आहोत, तुमची साथ आम्हाला नव ऊर्जा देते.
धन्यवाद.
आपला
वैद्य हरिश पाटणकर,
डायरेक्टर, केशायुर्वेद.
www.keshayurved.com
भारतातील पहिली आयुर्वेदिक लॅब व रिसर्च सेंटर.
जगभरात 108 शाखा नी सेवेसाठी सुसज्ज.
video पाहण्यासाठी येथे क्लिक करा