Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Before/After Treatment Result
....आणि तिचे केस परत आले ते ही अगदी घनदाट

Kolhapur  February 21,2021

  

 

काल तब्बल एक वर्षानंतर #विश्वपंढरी मधील #केशायुर्वेद व्हिजीट पुन्हा सुरु झाली. कोव्हीडमुळे अनेक रुग्णांचे उपचार तर खंडीत झालेच त्याबरोबर आमचीही सेवा खंडीत झाली. तिसरा रविवार आला की कधी एकदा विश्वपंढरीला जातो आणि सद्गुरू आनंदानाथ महाराजांचे पदस्पर्श प्राप्त करतो असे होते. सद्गुरूच्या कृपेने साकार झालेल्या भव्य अशा श्री विश्ववती आयुर्वेदीक चिकित्सालय येथे तिसऱ्या रविवारची व्हिजिट निरंतर सुरू असते. सद्गुरू कृपा म्हणा किंवा स्थानमहात्म्य म्हणा येथील सर्वच लोकांना ट्रीटमेंटचे खूपच चांगले फायदे होतात आणि तेही अगदी कमी कालावधीमध्ये. लॅाकडाऊनमुळे अनेक रुग्णांच्या ट्रीटमेंटमध्ये खंड पडला होता पण बऱ्याच रुग्णांनी लॅाकडाऊन उघडल्यानंतर संपर्क करून चिकित्सा चालू ठेवली. या काळात विश्ववती मधील डॉ. दिपक सरांच्या संपर्कात राहून सर्व रुग्णांची चिकित्सा पूर्ववत सुरु केली. डॉ. हरिश पाटणकर सरांचे मार्गदर्शन वेळोवेळी होतेच. काल व्हिजीट पुन्हा सुरु झाली नवीन रुग्ण तर आलेच त्याबरोबरच आमचे जुने रूग्ण ही आवर्जून भेटायला आले. त्यातील एका महिला रुग्णाचा फोटो पोस्ट केलेला आहे. त्याची ट्रीटमेंट सुरु झाली आणि नेमका लॅाकडाऊन झाला. पण याकाळात त्यांनी सतत व्हाट्सअप वरून संपर्कात राहून आहार-विहाराबद्दलचे मार्गदर्शन घेतले. आता गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे औषधी उपचार पुन्हा सुरु केले. ट्रीटमेंट दरम्यान त्यांनी स्वेच्छेने केस कमी केले त्यामुळे तेल मालिश चांगल्याप्रकारे होऊ शकली आणि त्याचेही चांगले फायदे झाले. तीनच महिन्यांमध्ये डाक्याच्या वरील भागातील विरळ झालेले त्यांचे केस परत आले आणि ते ही अगदी घनदाट. 👧 शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विस्मय आणि आयुर्वेदावरचा विश्वास दृढ होताना पाहिला आणि माझाही आनंद द्विगुणित झाला. 😊 आयुर्वेदावर पूर्ण विश्वास ठेऊन श्रद्धेने औषधे घेणाऱ्यांना आयुर्वेद निराश करत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली. माझ्या हातून रुग्णांची, आयुर्वेदाची आणि सद्गुरूंची सेवा निरंतर घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

डॉ. ओमप्रसाद जगताप, सांगली.
8867343202